पिंगुळी उबाठा कार्यकर्त्यांची महावितरण कार्यालयात धडक

वारंवार वीजपुरवठा खंडित असल्यामुळे दिला आंदोलनाचा इशारा

कुडाळ प्रतिनिधी: पिंगुळी गावामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पिंगुळी उबाटा गटाचे शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते यांची महावितरण कार्यालयावर धडक पिंगुळी गाव मध्ये पाऊस सुरू झाल्यापासून तास तास विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. परिणामी लाईट अभावी लोकांची मोठी गैरसोय होत आहे. तरी याबाबत आपण स्वतः लक्ष घालून सुरळीत विद्युत पुरवठा करून मिळावी ही विनंती तसेच अनेक ठिकाणी लाईन वर झाडांच्या फांद्या आलेले आहेत त्या तोडून विद्युत वाहिनी मोकळ्या करण्यात याव्यात.

अन्यथा आठ दिवसाच्या अल्टिमेटानंतर उबाटा शिवसेना युवासेना पिंगुळीचा वतीने महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडणार… यावेळी शिवसेना उबाटा गटाचे पिंगुळी विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, युवा सेना तालुका सचिव केतन शिरोडकर, दीपक गावडे, बाबल गावडे, मिलिंद परब,हेमंत पिंगुळकर, तुळशीदास पिंगुळकर, दीपक धुरी, केदार रासम, अजय बांदेकर,भरत परब, कपिल म्हापसेकर, धनंजय पेडणेकर, तसेच शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!