राज्यातील महत्त्वाकांक्षी असणारे नदीजोड प्रकल्प मार्गी लावू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

मुंबई प्रतिनिधी: पुढील पाच वर्षांत राज्यातील महत्त्वाकांक्षी असणारे नदीजोड प्रकल्प मार्गी लावून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.फडणवीस म्हणाले, “मागील अडीच वर्षांपूर्वी राज्यात आमचे सरकार आले. त्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर मी आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झालो. या काळात आम्ही अनेक योजना सुरू केल्या असून त्या आता वेगाने पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्र राज्य दुष्काळापासून मुक्त होईल

पुढील काळात नदीजोड प्रकल्प अधिक गतिमान करण्यावर माझा भर असणार आहे. पाटबंधारे मंत्री म्हणून, मी चार नदीजोड प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.” महाराष्ट्र राज्य दुष्काळापासून मुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.हरित ऊर्जेवरदेखील (ग्रीन एनर्जी) भर दिला जाणार असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, २०३० पर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश वीज ही हरित ऊर्जा राहील. शेती आणि उद्योगाला त्याचा अधिक फायदा होणार असे झाले तर रोजगाराचीही निर्मिती होऊन अर्थकारणाला देखील चालना मिळेल.फडणवीस म्हणाले, की मुंबईच्या ‘एमएमआर’ परिसरातील कोणत्याही भागात एक तासात जाता आले पाहिजे, अशी घोषणा मी २०१६ केली होती. आम्ही त्याच्यापुढे आता सागरी मार्ग (कोस्टल रोड) पूर्ण केला. वर्सोवा-मढची निविदा काढली असून ते कामही सुरू होईल. मढपासून विरारपर्यंत ‘सी लिंक’ तयार करण्यात आली आहे. जपान सरकारने त्यासाठी ४० हजार कोटी रुपये देण्याची ग्वाही दिली. त्यामुळे मुंबईची वाहतूक कमी होणार असून सुमारे ३७५ किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळ्याची यासाठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!