लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली शाळेतील विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे आणि पॉस्को कायद्याचे मार्गदर्शन

रोटरी क्लब ऑफ कुडाळ व पोलीस स्टेशन कुडाळ यांचा संयुक्त उपक्रम

बुधवार दिनांक २९ जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ कुडाळ व पोलीस स्टेशन कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हे आणि पॉस्को कायद्याबाबत माहिती आणि जनजागृती व त्याचे होणारे दुष्परिणाम याच्याबद्दल सविस्तर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रशालेतील जवळपास २५० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. उपस्थित सर्व मुलांना कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री प्रमोद काळसेकर यांनी पॉस्को कायदा आणि त्याचे दुष्परिणाम याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाने मुलं क्षणभर भावुक झालेली दिसली. तसेच सायबर गुन्हे होऊ नये त्यासाठी काय काय काळजी घ्यावी तसेच मुलं पोलीस मित्र कसे बनू शकतात याबद्दल रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी तसेच MKCL जिल्हा समन्वयक रो.श्री प्रणय तेली यांनी मुलांना उपयुक्त मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास कुडाळ रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.श्री मकरंद नाईक, रो.श्री प्रणय तेली,पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री प्रमोद काळसेकर, पोलीस कॉन्स्टेबल श्री नारायण गंगावणे, संस्थेचे पदाधिकारी श्री दत्ता वारंग, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सुनील भाटीवडेकर, सहा. शिक्षिका आणि इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या सदस्या सौ मनाली नाईक इतर शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!