वेत्ये येथील घटना
सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्ग वेत्ये येथे पुण्यावरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडीचा टायर फुटून भीषण अपघात घडला आहे. या अपघातात पर्यटक थेट गाडीतून बाहेर फेकले गेले. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत इतरांना बाहेर काढले.
दरम्यान यावेळी सरपंच गुणाजी गावडे यांनी शासकीय रुग्णवाहिका गाडी उपलब्ध करण्यासाठी फोन केला असता, ती उपलब्ध झाली नसल्याने खाजगी रुग्णवाहकेने त्यांना बांबोळी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. योग्य वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त केली.