कोंकण एक्स्ट्रीम अँग्लर्स यांचे आयोजन
कोंकण एक्स्ट्रीम अँग्लर्सने भोगवे येथे भरवलेली भारतातील सर्वात पहिली खोल समुद्रातील बोट फिशिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. कोकणातील किनारपट्टीवर गेली ५ वर्षे ही स्पर्धा भरवली जाते. यंदा सहाव्या वर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा खोल समुद्रात रॉडच्या साह्याने मासे पकडण्याची होती. एका बोटीवर ५ स्पर्धक, एक बोट तांडेल (captain) आणि आयोजनाकडून एक मार्शल. अशी ७ जणांची टीम. असे संपूर्ण भारतातून १२ वेगवेगळे संघ उपस्थित होते. मुंबई, पुणे, रत्नागिरी, पनवेल, मंगळूर, बेंगलोर, गोवा अश्या वेगवेगळ्या ठिकाणाहून हे स्पर्धक आले होते.
गोबरा, कोकीर, बोडावा, डागोळ, सुरमई अश्या प्रजातींचे मासे आपल्या निवती लाइट हाऊस परिसरात असल्याने ही स्पर्धा त्या परिसरातील खोल समुद्रात खेळवली गेली. जिगिंग, पॉपिंग, स्पिनिंग, ट्रॉलिंग या रॉड फिशिंग मधील क्रिडा प्रकाराने मासे पकडणे हा या स्पर्धेचा मुख्य नियम होता तसेच ज्या माश्यांच्या दुर्मिळ प्रजाती आहेत आणि जर चुकून गळाला लागल्या तर त्या पुन्हा समुद्रात सोडून द्याव्या हा देखील नियम बंधनकारक होता.
आलेल्या स्पर्धकाची सेफटी ची काळजी घेऊनच ही स्पर्धा भरवली गेली ज्यामध्ये जॅकेट्स, बोया रिंग, मेडिकल सर्विस, बॅकप बोट, एक्स्ट्रा इंजिन, प्रत्येक बोटीवर पाणी बॉटल आणि नाश्ता, कचरा टाकण्यासाठी बिन बॅग या सर्व सोई आयोजकांकडून पुरवल्या गेल्या.
कर्नाटक राज्यातून आलेल्या टीम मलबारीझ या संघाने तब्बल १२.५०० किलोचा घोबरा प्रजातीचा मासा पकडून पाहिला तर रत्नागिरीच्या रेड मरीन संघाने दुसरा आणि गोव्याच्या लुअर लीजंट या संघाने तिसरा क्रमांक पटकावला.
प्रथम संघाला रोख रक्कम ७५००० /- , kxa ट्रॉफी, मेडल आणि टॅकलस आणि संपूर्ण संघाला अंदमान फिशिंग ट्रिप व बोटच्या कॅप्टन म्हणजेच तांडलाला रोख रक्कम १०००० /- देण्यात आली.
द्वितीय संघाला रोख रक्कम ५०००० /- , ट्रॉफी, मेडल आणि टॅकल
तृतीय संघाला रोख ३५००० /- , ट्रॉफी, मेडल आणि टॅकल
फर्स्ट कॅच- विनायक महाडीक मुंबई
मॅक्स कॅच – कौशल केळसकर व अनिकेत निरोखेकर रत्नागिरी
अँग्लर ऑफ द ईअर – डॉ. कस्तुरे रत्नागिरी
लेडी अँगलर – दीक्षित मॅडम बेंगलोर
वयक्तिक बक्षिसे – ट्रॉफी, मेडल आणि टॅकेल्स.
आयोजक – पराग वाडकर, ओंकार शिवलकर, वैभव कदम, अभिषेक आळेकर, पियुष वाकडे, विनायक बोडणेकर, दत्ता पदुमले,
स्थानिक सहकार्य – राजा रोगे, महाराजा बोट सर्विस, ऋषी सामंत रोहित सामंत, राजन मालंडकर,मंगल सामंत आर्यावर्त कृषी पर्यटन