कुडाळ प्रतिनिधी: जांभवडे बामणवाडी ता.कुडाळ येथील रहिवाशी,ज्युन्या पीढीतील सामाजिक कार्यकर्ते व भजनी बुवा कै.शिवराम कृष्णा तर्फे यांचे अल्प आजाराने वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले.गावातील सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रमात नेहमीच त्यांचा पुढाकार असे.मुंबई स्थित सामाजिक कार्यकर्ते श्री.अविनाश तर्फे यांचे ते वडील होत.तर सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.वामन तर्फे यांचे काका होत.त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी,सुना, दोन भाऊ,पुतणे, पुतण्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे*