योग्य निर्णय होवून सरकार स्थापन होईल. विरोधकांनी चिंता करु नये

मंत्री उदय सामंत यांचे विरोधकांना खरमरीत प्रत्युत्तर

रत्नागिरी प्रतिनिधी: विधानसभा निवडणुक झाल्यानंतर आता EVM मशीन वरून विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत. यावर प्रत्युत्तर करताना मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीच्या एकतर्फी जागा निवडून आल्याने विरोधक अस्वस्थ आहेत. ईव्हीएमची चौकशी, तपासणी जे काही करायचे आहे ते अमेरिका, लंडनमधील तज्ज्ञ आणून केले तरी महायुतीला फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेते, आमदार उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

काय म्हणाले मंत्री उदय सामंत?

कमी जागा आल्या म्हणून महाविकास आघाडीकडून अगदी खालच्या पातळीवर जावून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. जनतेने महायुतीला स्वीकारुन महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांनी जरुर ईव्हीएमची तपासणी कोणाकडूनही करुन घ्यावी. जनतेने महायुतीला निवडून दिल्याने हा सर्व खटाटोप विरोध करत आहेत, असेही उदय सामंत यांनी शनिवारी नगर परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. सरकार स्थापनेची विरोधकांना चिंता नको’2019 ला सरकार स्थापन करण्यासाठी 36 दिवस लागले होते. आता आरोप करणारे त्यावेळी गप्प होते. विधानसभा निकाल लागून आठवडा पण झाला नाही, तर सरकार स्थापन होत नसल्याच्या उलट-सुलट चर्चा विरोधकांमधून सुरु आहे. आमच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये संवाद आहे. त्यामुळे योग्य निर्णय होवून सरकार स्थापन होईल. विरोधकांनी चिंता करु नये, असे उदय सामंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *