कोकणातून ” श्रीक्षेत्र शेगाव ” येथे जाणाऱ्या एकमेव रेल्वेला मुदतवाढ देण्यात यावी

खा. नारायण राणे, आ. निलेश राणे यांचे माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी वेधले लक्ष

शेगाव निवासी ” संत गजानन महाराज ” यांच्या दर्शनासाठी भाविकांसाठी उपयुक्त ठरणारी त्याचबरोबर कोकणातून नागपूरला जाण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा जाणारी एकमेव रेल्वे सेवा डिसेंबर महिन्याच्या अखेरीस बंद होणार आहे. या रेल्वेला कुडाळ येथे मुख्य थांबा आहे. तरी सध्या चालू असलेली मडगाव ते नागपूर स्पेशल रेल्वे आणि नागपूर ते मडगाव स्पेशल रेल्वे सेवा अविरत चालू राहून त्यास मुदतवाढ मिळावी. याबाबत मा.रेल्वेमंत्री भारत सरकार यांच्याशी पाठपुरावा करावा. आणि न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी कुडाळ नगरपंचायतीचे माजी नगरसेवक आणि स्वामीभक्त राकेश कांदे यांनी सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे व कुडाळ – मालवण मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांच्याकडे केली आहे.

error: Content is protected !!