आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदू कॉलनी येथील शिशु वाटिका येथे कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने प्रोजेक्टर भेट देण्यात आला यावेळी शिशुवाटिकेच्या शिक्षकांनी आभार व्यक्त केले.
हिंदू कॉलनी येथील शिशु वाटीकेला शैक्षणिक साहित्याची आवश्यकता होती याबाबत येथील शिक्षकांनी शिवसेनेचे सोशल मीडिया प्रमुख राजवीर पाटील यांच्याकडे प्रस्ताव ठेवला त्यानुसार या शिशु वाटीकेला आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रोजेक्टर देण्यात आला यावेळी शहर प्रमुख अभिषेक गावडे, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, माजी नगरसेवक राकेश कांदे, साक्षी सावंत, रेखा काणेकर, चेतन पडते, शाखाप्रमुख बाळा कुडाळकर, सोशल मीडिया प्रमुख राजवीर पाटील, नागेश कुडाळकर विठ्ठल मडवळ तसेच शिशुवाटिकेमधील सौ योगिता कवठणकर, सौ. अक्षता कुडाळकर, सौ गौरी राऊळ, सौ स्वाती केरवडेकर, श्री उमेश नाडकर्णी, श्रीधर गोरे, श्री मिलिंद देसाई, सुशांत राऊळ, अनिल कवटकर मंगेश रोड कर निलेश परब, तिरोडकर,श्री रुपेश कावले तसेच उपस्थित पालक व शिशुवाटिकेतील सर्व मुले उपस्थित होते.