आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या “पिकल बॉल” खेळाचे धडे आता सिंधुदुर्गात

सावंतवाडी प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा “पिकल बॉल” या खेळाचे धडे आता सिंधुदुर्गात दिले जाणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यात विविध ठिकाणी या खेळाची मैदाने विकसित करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा असोशियन स्थापन करण्यात आली असून त्या असोसिएशनच्या अध्यक्षपदी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान या खेळाच्या माध्यमातून जास्तीत-जास्त खेळाडू घडविण्यासोबत ते आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास पिकल बॉलचे नॅशनल चेअरमन सुमित दत्त यांनी व्यक्त केला.आज येथे राजवाड्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवराज लखम राजे भोसले. पिकल बॉल टूर्नामेंट चे नॅशनल चेअरमन सुमित दत्त, ऍड नकुल पार्सेकर संतोष राणे देवेन ढोलम आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा खेळ खेळला जावा हा उद्देश

युवराज लखमराजे म्हणाले, पिकल बॉल असोसिएशनची स्थापना दीड दोन महिन्यापूर्वी करण्यात आली परंतु निवडणूक आचारसंहिता असल्याने याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती पिकल बॉल हा खेळ संपूर्ण भारतामध्ये खेळला जात आहे लहान मुलांसह ज्येष्ठ व्यक्ती एकत्रित यावर हा खेळ खेळत आहेत नजीकच्या गोवा राज्यामध्ये या खेळाला अधिक महत्त्व दिले जात असून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हा खेळ प्रचलित करून तो शालेय विद्यार्थी तसेच इथल्या युवकांमध्ये खेळला जावा याकरता असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे या माध्यमातून शालेय स्पर्धा तसेच त्यासाठी आवश्यक असलेले ट्रेनिंग आम्ही देणार आहोत जेणेकर जास्तीत-जास्त हा खेळ इथले विद्यार्थी तरुण वर्ग खेळतील हा यामागचा उद्देश आहे. येथील राजवाड्यामध्ये यासाठी ग्राउंड तयार करण्यात येणार असून त्या ठिकाणी या खेळाचे धडे दिले जाणार आहेत. माझ्यासोबत युवराज्ञी श्रद्धाराणी सुद्धा या खेळासाठी पुढाकार घेणार आहेत.

खेळ ताकतीचा खेळ नसून बुद्धीचा खेळ

या खेळातील जाणकार सुमित दत्त म्हणाले बॅडमिंटन टेबल टेनिस आणि टेनिस या खेळातील एकत्र मिश्रण असलेला पिकल बॉल हा खेळ आहे जवळपास ३० वर्षापासूनचा जुना हा खेळ असून अमेरिकेमध्ये या खेळाची निर्मिती झाली आहे परंतु हा खेळ म्हणावा तसा खेळला जात नसल्याने याची आवड आणि त्याचा प्रसार हवा तसा झाला नव्हता. परंतु देशातील लॉकडांच्या काळात हा खेळ खेळला गेल्याने त्याची आवड आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. सद्यस्थितीत संपूर्ण देशभर या खेळाला मोठी पसंती असून तरुण वर्गासह जेष्ठ नागरिक महिला आदींमध्ये या खेळाची रुची निर्माण झाली आहे. हा खेळ ताकतीचा खेळ नसून बुद्धीचा खेळ आहे. शिवाय लवकर शिकता येतो. गोवा राज्यांमध्ये या खेळाला प्रोत्साहन दिले जात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही या खेळाची आवड निर्माण होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्यासाठी शालेय स्तरावर आणि युवकांमध्ये टीमच्या माध्यमातून या खेळाला पुढे घेऊन जाणार आहोत त्यासाठी योग्य पद्धतीने खेळाचे मार्गदर्शन आमच्या माध्यमातून दिले जाणार आहे जास्तीत जास्त तरुण या खेळांमध्ये तयार होऊन हा खेळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संपूर्ण राज्यात घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत देशाच्या क्रीडा संचनालयान कडून या खेळाला मान्यता देण्यासाठी हालचाली सुरू आहेत त्यामुळे लवकरच हा खेळ खेलो इंडियासारख्या स्पर्धांमध्येही येणार आहे.

error: Content is protected !!