आ.निलेश राणे विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व
मालवण प्रतिनिधी: आमदर निलेश राणे हे विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व आहेत. मालवण कुडाळच्या विकासासाठी त्यांची असलेली तळमळ गेल्या चार वर्षात जनतेने पहिली. आमदार पदी विजयी झाल्यानंतर त्यांनी नव्या तसेच रखडलेल्या विकास प्रकल्पांकडे विशेष लक्ष दिले आहे. आमदार निलेश राणे यांच्या सुचनेनंतर मालवण बसस्थानक इमारत काम ही गतिमानपणे सुरु झाले आहे. लवकरात लवकर काम पुर्ण होताच जुनी जीर्ण इमारत जमीनदोस्त करून नवी इमारत प्रवाशांच्या सेवेत असेल. असा विश्वास भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी व्यक्त केला आहे.मालवण बसस्थानक येथील नव्या इमारत कामाची पाहाणी गुरुवारी एसटी प्रशासन अधिकारी, ठेकेदार एजन्सी आणि भाजपा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक जगदीश गांवकर भाजपा युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, दादा वाघ, नंदू देसाई, संदीप मालंडकर, कमलाकर कोचरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाजपा शहराध्यक्ष बाबा मोंडकर म्हणाले 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात या इमारतीसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु मागील पाच वर्षे वैभव नाईक यांच्या आ कार्यकाळात इमारतीचे काम रखडत सुरु होते. त्यांनी ठेकेदारी हिशेबाने कामाकडे पाहिले असावे. त्यामुळेच काम रखडले. मात्र मागील अडीज वर्षे महायुती कार्यकाळात विकासकामानी गती पकडली. राणे साहेब यांच्या पाठपुराव्याने बसस्थानक इमारतकामही सुरु झाले. लवकरात लवकर इमारत काम पुर्ण होऊन प्रवासी वर्गाच्या सेवेत इमारत दाखल व्हावी. तसेच सध्य स्थितीत याठिकाणी असलेली शौचालय व्यवस्था योग्य नसल्याने इमारत काम पुर्ण होई पर्यत त्यात सुधारणा तसेच नगरपालिका माध्यमातून फिरत्या शौचालयाची व्यवस्था प्रवासी वर्गासाठी करून घ्यावी. जीर्ण इमारत काही ठिकाणी कोसळते आहे. त्याठिकाणी सुरक्षा व्यवस्था करावी. एकूणच नव्या इमारतीचे अंतिम टप्प्यात राहिलेले काम लवकर पुर्ण करावे. जुनी इमारत जमिनदोस्त करून नवी इमारत प्रवासी वर्गाच्या सेवेत लवकर यावी. याबाबत विस्तृत चर्चा पाहाणी दरम्यान बाबा मोंडकर सुदेश आचरेकर यांनी केली.
लवकरच मालवण कुडाळ मधील विकासकामांच्या आढावा बाबत बैठक
तसेच लवकरच खा. नारायण राणे, आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवण कुडाळ मधील विकासकामांच्या आढावा बाबत बैठक होईल. याचा विचार करता गतिमान काम व्हावे. असे मोंडकर आचरेकर यांनी सांगितले.प्रवासी वर्गाची गैरसोय दूर व्हावी, बसस्थानक इमारत लवकर प्रवासी सेवेत यावी यां उद्देशाने आमदार निलेश राणे यांच्या सुचनेनुसार करण्यात आलेल्या यां पाहाणी दरम्यान सकारात्मक चर्चा झाली. लवकरात लवकर नवी इमारत प्रवसी वर्गाच असेल असे सांगण्यात आले.














 
	

 Subscribe
Subscribe









