वनेच राहिली नाहीत तर वनमंत्री काय कामाचे ?

वनमंत्री स्वतःला टीआरपी मिळवण्यासाठी व्यस्त दिसत आहेत

आमदार निलेश राणे यांची वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर टीका

मोठ्या प्रमाणावर जंगलतोड सुरू असल्यामुळे वन्यप्राणी शेतांमध्ये घुसू लागले आहेत. वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी शेती सोडली आहे. नवी मुंबईच्या डोंगरांप्रमाणे आता जंगल पोखरली जात आहेत. वनेच नाही राहिली तर वनमंत्री काय कामाचे ? वनमंत्री स्वतःला टीआरपी मिळवण्यासाठी व्यस्त दिसत आहेत. अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर टीका केली आहे.

त्यांनी असे म्हटले आहे की, मंत्री गणेश नाईक हे वनमंत्री आहेत. मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. ज्यामुळे जनावरांचा त्रास होतो. कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेती जवळपास या जनावरांच्या त्रासामुळे सोडलेली आहे. अनेक ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर नाहीत. फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे नाहीत, साधनसामग्री नाही, डीएफओ दुसऱ्या राज्यातले असल्यामुळे त्यांचा उपयोग ग्रामीण भागाला होत नाही. लाकुडतोडी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालते की मनमंत्र्यांच्या परवानगीने चालली आहे का ? असा प्रश्न पडायला लागलाय वन राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे ? जसे नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे आता जंगल पोखरले जात आहेत. अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंट परवानगी देत नाही. ज्यामुळे ग्रामीण भाग विकासाच्या योजनांपासून वंचित राहतो. वरील सगळे विषय गंभीर आहेत पण सध्या वनमंत्री स्वतःला टीआरपी मिळवण्यासाठी व्यस्त दिसत आहेत. अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर टीका केली आहे.

error: Content is protected !!