CET परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर

ब्युरो न्यूज: राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) संभाव्य वेळापत्रक महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केले आहे. त्यानुसार, शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये अभियांत्रिकीसह औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी, अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ९ ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

तंत्रशिक्षण आणि कृषी विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी

‘एमएचटी सीईटी’ (पीसीबी गट) परीक्षा ९ ते १७ एप्रिल दरम्यान होणार आहे.

तर, तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत अभ्यासक्रमांसाठी ‘एमएचटी सीईटी’ (पीसीएम गट) परीक्षा १९ ते २७ एप्रिल या कालावधीत आयोजित केली आहे, अशी माहिती प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे.

एमएचटी-सीईटी परीक्षेचा कालावधी -एमएचटी सीईटी (पीसीबी गट) : ९ ते १७ एप्रिलएमएचटी सीईटी (पीसीएम गट) : १९ ते २७ एप्रिल

सीईटी’ परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

परीक्षा : कालावधी

M.Ed, M.P.Ed: 16 मार्च

एमबीए/एमएमएस : १७ ते १९ मार्च

एलएलबी (तीन वर्ष) : २० आणि २१ मार्च

MCA: 23 मार्च

बी.एड (जनरल आणि स्पेशल), बी.एड ईएलसीटी : २४ ते २६ मार्च

B.P.Ed, M.HMCT: 27 मार्च

बी.एचएमसीटी/एम.एचएमसीटी (इंटिग्रेटेड), बी.ए-बी.एड/ बी.एस्सी-बी.एड (चार वर्ष इंटिग्रेटेड), बी.एड-एम.एड (तीन वर्ष इंटिग्रेटेड) : २८ मार्च

बी. डिझाइन : २९ मार्च

B.BBA/BCA/BBM/BMS: १ ते ३ एप्रिलएलएलबी (पाच वर्ष) : ४ एप्रिल

एएसी : ५ एप्रिल

नर्सिंग : ७ आणि ८ एप्रिल

डिपीएन/पीएचएन : ८ एप्रिल

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ – www.mahacet.org

error: Content is protected !!