फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघात अनंत पिळणकर यांचा प्रचाराचा झंझावात
मतदारांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
कणकवली (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद फोंडाघाट पंचायत समिती मतदारसंघात महाविकास आघाडीचे जिल्हा परिषद उमेदवार अनंत पिळणकर व पंचायत समितीचे उमेदवार चैतन्य सावंत यांनी बिजलीनगर, पिंपळवाडी येथे घरोघरी प्रचाराचा जोरदार धडाका सुरु केला.मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून घरोघरी मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या नंतर मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत असुन मतदार महाविकास आघाडीच्या बाजूने उभे असुन फोंडाघाट मतदार संघातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत असून फोंडाघाट जिल्हा परिषद मधून तीन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.असे वातावरण असल्याने आमचा विजय निश्चित असल्याचे महाविकास आघाडीचे जिल्हा परिषद उमेदवार अनंत पिळणकर यांनी सांगितले
या प्रचारात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुंदर पारकर गुरुजी, सौ. प्रतिभा अवसरे, शिवसेना तालुकाप्रमुख माधवी दळवी, संजना कोलते, शिवसेना विभाग प्रमुख सिद्धेश राणे, सुरेश टक्के, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विभाग प्रमुख रमेश राणे, लोरे शाखाप्रमुख निलेश राणे, देवेंद्र पिळणकर, प्रीतम राणे, तुषार पिळणकर, विजय ताईशेटे, अमित लाड तसेच महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.









Subscribe









