रिफायनरी जबरदस्तीने लादली जाणार नाही

उद्योग मंत्री आ.उदय सामंत यांचे वक्तव्य

रिफायनरी बाबत आमची भूमिका स्थानिकां सोबत

रत्नागिरी प्रतिनिधी : कित्तेक वर्ष वादाच्या भोवऱ्यात असलेल्या रत्नागिरी येथील बरासू रिफायनरी प्रकलपाबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपण रिफायनरी जबरदस्तीने लोकांवर लादनार नसल्याचं वक्तव्य केलं आहे .

काय म्हणाले मंत्री उदय सामंत?

नाणार-बारसू रिफायनरीबाबत आमची भूमिकास्थानिकांबरोबर असेल. त्यांना प्रकल्प काय हे पटवून देऊ. त्यांना हवा असेल तर होईल, नको असेल तर तसा विचार होईल. मात्र, रिफायनरी जबरदस्तीने लादली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका माजी उद्योगमंत्री व आ. उदय सामंत यांनी व्यक्त केली.विधानसभेच्या निवडणुकीत पाचव्यांदा विजय मिळाल्यानंतर मुंबईत जाऊन काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ते रत्नागिरीत आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मतदार संघातील अपूर्ण कामाचा घेतला आढावा

दरम्यान यावेळी त्यांनी मतदार संघातील अपूर्ण कामांचा आढावा घेतला. मतदार संघात मालगुंड येथे प्राणी संग्रहालयाचे काम सुरू आहे. रत्नागिरीसह जिल्ह्यातील एसटी स्टॅण्डच्या कामांची माहिती घेतली. शिवसृष्टी, थिबापॅलेस येथील प्रकल्प, यासह मतदार संघात येऊ घातलेल्या दोन औद्योगिक प्रकल्पांचा आढावा, टाटा स्कील सेंटरच्या कामाची सद्यस्थिती यासह अन्य कामांचा आढावा घेतल्याचे आ. सामंत यांनी सांगितले. यातील अनेक कामे दोन महिन्यात पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न

कोकणातील रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हावा यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला याच ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!