न्यू शिवाजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज ऑफ कॉमर्स व सायन्स जांभवडेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ. दिपलक्ष्मी पडते यांच्या हस्ते संपन्न..

कुडाळ : माध्यमिक शिक्षण समिती, जांभवडे पंचक्रोशी संचलित न्यू शिवाजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज ऑफ कॉमर्स व सायन्स एम.सी.व्ही.सी., जांभवडे (इंग्रजी माध्यम विभाग) वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले.

यानिमित्ताने प्रशालेच्या वतीने विज्ञान प्रदर्शन आणि विविध क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या आणि नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण कार्यक्रम देखील मोठ्या थाटामाटा संपन्न झाला. त्यानंतर मुलांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ. दिपलक्ष्मी पडते यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाष मडव, प्रशालेचे मुख्याध्यापक कासले सर, शिक्षक वृंद त्याचप्रमाणे कुडाळ पंचायत समितीच्या माजी सभापती नुतन आईर, शिवसेना महिला तालुका सचिव सौ. रेवती राणे, कुडाळ नगरसेवक सौ. श्रुती वर्दम, रेखा काणेकर, साक्षी सावंत, शिवसेना पदाधिकारी, गावातील ग्रामस्थ व पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सौ. दिपलक्ष्मी पडते यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी अंगीभूत कलागुण जोपासण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज आहे असे प्रतिपादन केले. ग्रामीण भागातील ही संस्था मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय सुंदर उपक्रम राबवत असून या माध्यमातून या मुलांना शैक्षणिक क्षेत्राबरोबरच विविध सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम तसेच अन्य उपक्रम राबवताना लागणारी सर्वतोपरी मदत करण्यासाठी या भागाचे आमदार निलेशजी राणे यांच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमात सहभागी केल्याबद्दल शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि संस्थेचे सर्व संचालक व प्रशालेचे शिक्षक यांचे आभार व्यक्त केले..

error: Content is protected !!