धनुष्य बाण दुसऱ्याच्या खांद्यावर होता तो आम्ही घेऊन आलो
रत्नागिरी प्रतिनिधी: विधानसभा निवडणूकीचे निकाल लागले असून महायुतीने बाजी मारली आहे.आता लक्ष आहे ते नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्री मंडळावर.अशातच शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत यांनी शपथविधी अगोदर मोठा गौप्यस्पोफ केला आहे. शिवसेना उबाठाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे.
काय म्हणाले उदय सामंत?
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पाच आमदार आमच्या संपर्कात आहेत. यावेळी दोन-तीन सोडता सर्व आमदार आमच्याकडेच येतील. रात्रीपासून हे आमदार आमच्या संपर्कात आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रथमच कोकणातून दोन भाऊ एकत्र निवडून आले आहेत. किरण सामंत, उदय सामंत हे दोन सख्खे भाऊ तर निलेश राणे आणि नितेश राणे हेही दोन सख्खे भाऊ आहेत. उदय सामंत म्हणाले, कोकणचा विकास आम्ही करु याचा आम्हाला विश्वास आहे.
याशिवाय उबाठा जे आमदार निवडून आले आहेत ते आमच्या संपर्कात आहेत त्यातीलही काही आमदार आमच्याकडे येतील. याबाबत मुख्यमंत्री शिंदे साहेब योग्य तो निर्णय घेतील. ईव्हीएम मध्ये गडबड असल्याचा आरोप आता समोरुन केला जातोय. जो धनुष्यबाण दुसऱ्याच्या खांद्यावर होता तो आम्ही घेऊन आलोय. गद्दारी कोणी केली हे पुन्हा एकदा दाखवून दिलं, असंही सामंत म्हणालेत.