महेंद्रा अकॅडमीचा आदित्य राऊळ सावंतवाडी भाजप आयोजित नमो युवा रन मॅरेथॉन मध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी

सावंतवाडी : महेंद्रा अकॅडमीचा विद्यार्थी आदित्य राऊळ ५ किमी सावंतवाडी भाजपा आयोजित नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. भारतीय जनता पार्टी आयोजित नमो युवा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत महेंद्रा अकॅडमीचा विद्यार्थी आदित्य राऊळ याने प्रथम क्रमांक पटकावला आहे त्याने अवघ्या 16.47 मिनीट मध्ये हे अंतर पार केले, त्यामुळे महेंद्रा अकॅडमीच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा रोवला गेला आहे.

error: Content is protected !!