ग्रामीण रुग्णालय रिक्षा स्टँड अध्यक्षपदी बाळा कुंभार तर उपाध्यक्षपदी चंदू वालावलकर यांची बहुमताने निवड

कुडाळ : ग्रामीण रुग्णालय रिक्षा स्टँड अध्यक्षपदी बाळा कुंभार तर उपाध्यक्षपदी चंदू वालावलकर यांची बहुमताने निवड करण्यात आली. २० ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामीण रुग्णालय रिक्षा स्टँडच्या सर्व सदस्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बाळा कुंभार यांची अध्यक्षपदी तर चंदू वालावलकर यांची उपाध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली.

या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्वांनी एकत्रितपणे कुटुंब म्हणून एकमताने काम करूया. तसेच आपल्या एकजुटीचा आदर्श निर्माण करूया. तसेच सदैव रिक्षाचालकांच्या हिताचे निर्णय घेऊन तालुक्यात १ नंबरचे स्टँड बनवूया असे अध्यक्ष बाळा कुंभार यांनी सांगितले. यावेळी रिक्षा युनियनचे सर्व सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!