कुडाळ : सिद्धिविनायक बिडबलकर खून प्रकरणातील संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट व गणेश नार्वेकर यांना पन्नास हजारांचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दिनांक ०९/०४/२०२५ रोजी मालती मधुकर चव्हाण (वय ५०, रा. मु. पो. चेंदवण, नाईकनगर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यांनी निवती पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर हा कुडाळ येथे सिद्धेश अशोक शिरसाट यांच्याकडे कामाला होता. तीन वर्षांपूर्वी बिडवलकरने आपण सिद्धेश शिरसाटकडून पैसे घेतल्याचे सांगितले होते, त्यावेळी मालती चव्हाण यांनी त्याला कामावर न जाण्यास सांगितले होते. २०२३ च्या गुढीपाडव्यापूर्वी बिडवलकर चेंदवण येथे आला होता. गुढीपाडव्यानंतर १० ते १५ दिवसांनी मालती चव्हाण घरी परतल्या असता, बिडवलकरची मूकबधिर मावशी शशिकला चव्हाण यांनी खाणाखुणांद्वारे सांगितले की, पहाटे सिद्धेश शिरसाट आणि त्याच्यासोबतच्या तीन व्यक्तींनी गाडीतून येऊन पक्याला जबरदस्तीने घेऊन गेले.
या घटनेनंतर तब्बल दोन वर्षांनी मालती चव्हाण यांनी सिद्धेश शिरसाट (रा. कुडाळ), गणेश नार्वेकर (रा. माणगाव), सर्वेश केरकर (रा. सातार्डा) आणि अमोल शिरसाट (रा. कुडाळ) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली.
त्यापैकी अमोल शिरसाट याला १४ जुलै २०२५ रोजी जमीन मंजूर झाला होता. तर उर्वरित संशयित आरोपींपैकी सिद्धेश शिरसाट व गणेश नार्वेकर यांना ५० हजारांचा सशर्त जमीन मंजूर झाला आहे.