भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर व भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष रूपेश कानडे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन
तेर्सेबांबर्डे गावातील उपसरपंच पदी असलेल्या सौ रोहिणी हळदणकर यांच्या एक वर्षाचा कार्यकाल समाप्त झाल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच या जागेची आज रोजी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यावेळी सर्वानुमते सौ धनश्री गवस यांची नुतन उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा प्रभारी ग्रामसेविक श्रीमती अनवी शिरोडकर यांनी केली
सौ धनश्री गवस यांची बिनविरोध निवड जाहीर होताच भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यावेळी त्यांच्या समवेत युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रुपेश कानडे , सरपंच रामचंद्र परब, अजय डीचोलकर सदस्य, संतोष डीचोलकर सदस्य, गुणाजी जाधव सदस्य, महेंद्र मेस्त्री सदस्य, प्रणाली साटेलकर सदस्य ,रोहिणी हळदणकर सदस्य, माधवी कानडे सदस्य, सुनील बांदेकर, प्रकाश साटेलकर, नाथा गवस, आदी उपस्थित होते