ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आवाहन
बुधवारी भरणारे आठवडा बाजार मतदानासाठी बंद
कुडाळ प्रतिनिधी: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ जाहीर झाली असून बुधवार दि.२० नोव्हेंबर,२०२४ रोजी मतदान होत आहे. या राष्ट्रीय प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपल्या हक्काबरोबर मतदान कर्तव्य प्रक्रियेत सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत प्रशासनाने वारंवार जनजागृती केलेली आहे. त्याला जिल्ह्यातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देणे आवश्यक आहे. मतदान या मुलभूत हक्कापासून कोणीही मतदार वंचित राहू नये यासाठी शासनाने मतदानादिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
बुधवारी भरणारे आठवडा बाजार मतदानासाठी बंद
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुधवारी भरणारे सर्व आठवडी बाजार मतदानासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. तरी सर्व सजग मतदारांनी त्यांचा लाभ घेऊन मोठ्या प्रमाणात मतदान करून या लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे. सुदृढ राष्ट्र व समृद्ध लोकशाही करण्याकरिता हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव ठेवून सर्वांनी जागृत राहून मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. जिल्ह्यातील मतदारांनी कोणत्याही आमिषाला व दहशतवादाला बळी न पडता मतदानाचा अधिकार बजावावा. सर्व निवडणूक शासकीय यंत्रणेला प्रतिसाद देऊन सर्व मतदार बंधू व भगिनींनी शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन बुधवार दि.२० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत घराबाहेर पडून हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव ठेवून मोठ्या प्रमाणात मतदान प्रक्रियेत सर्वांनी सहभागी व्हावे. तसेच ” मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो ” असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केले आहे.