उद्या होणार आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा
कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव विजय नाईक यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे रविवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी ठीक ६ वाजता कुडाळ तालुक्यातील माणगाव बाजारपेठ येथे त्यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे. तरी या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे.