शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांचं मतदारांना जाहीर आवाहन
सिंधुदुर्ग : महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांनी आपली राजकारणाची सुरुवात सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदापासून सुरुवात केली.त्यांनी जिथून आपली राजकीय जीवनाची सुरुवात केली तेव्हापासून त्यांनी सतत विजय संपादन केला. दीपक केसरकर यांनी सुरवातीला शिवसेना भाजपाची सत्ता असताना महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्यातील तरुणांना आपल्या शांत स्वभावाने गुन्हेगारीपासून दूर ठेवले. त्याचकालावधीत दिपक केसरकर महाराष्ट्र राज्याचे वित्त व नियोजन मंत्री हे खाते होते.या खात्याअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जिल्हा वार्षिक नियोजन आरखडा ४०० कोटी एवढा केला.आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला चालना दिली.त्यांनी चांदा ते बांदा, सिंधुरत्न समिती योजना यारख्या युवकांना रोजगाराभिमुख प्रकल्प आणले. तसेच महायुतीच्या कार्यकाळात दिपक केसरकरांनी मुंबई कोल्हापूर सारखे पालकमंत्री पद भूषविले. मुंबई उपनगरचे पालकमंत्री असताना त्यांनी जर्मनी या देशासोबत नोकरी संदर्भात करार करून महाराष्ट्र राज्यातील तरुण तरुणींना जर्मन भाषा अवगत व्हावी म्हणून मोफत प्रशिक्षण देऊन जर्मनी या देशात रोजगाराभिमुख कामे उपलब्ध करून दिली. चांदा ते बांदा,सिंधुरत्न समृध्दी योजने अंतर्गत तरुणांना कुकुटपालन योजनेसाठी अनुदान, शेळी मेंढी पालन योजनेसाठी अनुदान,गाई – म्हैस पालन योजनेसाठी अनुदान,महिलांना बचत गटांतर्गत अन्नप्रक्रिया उद्योग,शेतकरी गट बनवून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी उपयुक्त वस्तू सेवा उपलब्ध करणे,न्याहारी निवास योजनेसाठी अनुदान, मूर्तिकलाकार यांना अनुदान,दशावतार कलाकार मंडळांना वाहन खरेदीसाठी अनुदान,गावोगावी विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविणे,मतदार संघात बॅरिस्टर नाथ पै.सेवांगण उभारणे,दोडामार्ग आयटी.आय.ईमारत बांधणे,मच्छी वाहतूक करणाऱ्या तरुणांना इन्सुलेटेड व्हॅन साठी अनुदान,अशी असंख्य रोजगाराभिमुख कामे दीपकभाई यांच्या माध्यमातून झाली. दिपकभाई हे उच्च शिक्षित उमेदवार आहेत.त्यांनी कधीच कोणावर टीका केली नाही.त्यांनी विरोधकांना कामातून उत्तर दिले.अशा शांत संयमी नेतृत्वाचे आपण जनतेने हात बळकट करून त्यांना पुन्हा एकदा आपल्या महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना निशाणी क्रमांक १ धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून सावंतवाडी,दोडामार्ग,वेंगुर्ला मतदार संघातील जनतेने मा.ना. दिपकभाई केसरकर यांना विधानसभेत पाठवावे आणि विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता विकासाचा कॅलिफोर्निया करणाऱ्या नेत्यांना विधानसभेत पाठवावे असे आवाहन शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी सावंतवाडीच्या जनतेला केले.
.