चेंदवण ग्रामपंचायत, श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय व स्त्रीशक्ती ग्रामसंघाचा स्तुत्य उपक्रम
चेंदवण : ग्रामपंचायत चेंदवण, श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण आणि स्त्रीशक्ती ग्रामसंघ, चेंदवण यांच्या संयुक्त सहकार्याने तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आले. विशेष म्हणजे हा बंधारा पूर्णपणे श्रमदानातून उभारण्यात आला असून, या उपक्रमातून जलसंधारणासोबतच ग्रामएकतेचे दर्शन घडले.
प्रशांत तेंडोलकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा समिती, शिक्षक, विद्यार्थी, स्त्रीशक्ती ग्रामसंघातील महिला तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वांनी एकत्र येत प्रत्यक्ष श्रमदान करून बंधाऱ्याचे काम पूर्ण केले.
यावेळी सरपंच वैभवजी चेंदवणकर, उपसरपंच प्रणाली तेंडुलकर ,शाळा समिती अध्यक्ष देवेंद्र नाईक, ग्रामपंचायत सदस्य विजयश्री मेस्त्री, अनुष्का टुंबरे, स्त्रीशक्ती ग्रामस़घ अध्यक्ष रश्मी नाईक यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
तसेच अंगणवाडी सेविका विनिता मेस्त्री, शकुंतला चेंदवणकर, कविता मयेकर, श्रद्धा नाईक, ग्रामस्थ अरुणा तेंडोलकर, सुचिता कोचरेकर, अमृता नाईक, बाळू कोचरेकर, संजना जुवेकर, उज्वला भरडकर, रविंद्र तोरसकर, समिधा टुंबरे, स्वरा पाटील, , सुचिता पाटकर, अंकुश चेंदवकर आदींनी सहभाग घेतला.
श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माणिक पवार, शिक्षक संतोष सांगळे, शरद नाईक, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी साळगावकर, तसेच प्रसाद रांगणेकर, अविनाश शृंगारे, ग्रामसखी सानवी चेंदवणकर, रेवती तोरसकर,व अनिल गुरव यांच्यासह विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे श्रमदान केले.
या उपक्रमात स्त्रीशक्ती ग्रामसंघ, चेंदवण यांनी दिलेले सहकार्य विशेष उल्लेखनीय ठरले. महिला शक्तीनेही या सामाजिक व जलसंधारणाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत श्रमदान केले.
या बंधाऱ्यामुळे पाण्याची साठवण होण्यास मदत होणार असून परिसरातील जलस्रोतांना त्याचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष श्रमदानातून जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक एकोप्याचा संदेश दिला.
ग्रामपंचायत, विद्यालय, स्त्रीशक्ती ग्रामसंघ आणि ग्रामस्थ यांच्या एकजुटीतून उभारलेला हा बंधारा ‘एकीचे बळ आणि श्रमदानातून विकास’ याचे उत्तम उदाहरण ठरला आहे. या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे प्रशांत तेंडोलकर तसेच सहभागी सर्व ग्रामस्थ, महिला, शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.


Subscribe










