महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आयोजन
कुडाळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क कुडाळ येथे मोफत आरोग्य शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाला. महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शिवाजी पार्कमधील सर्व सदस्यांची मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, वजन व बीएमआय तपासणी मोफत करण्यात आली. तसेच आरोग्य विभागामार्फत मोफत औषध उपलब्ध करून देत तज्ञांकडून समुपदेशन करण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पार्क G विंगच्या वतीने उपस्थित आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विलास गावडे यांच्या हस्ते डॉ. कृष्णहरी त्यागी यांना तर आरोग्य सेविका प्रज्ञा कांबळे व ललिता पवार यांना सचिव कस्तुरी परुळेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देण्यात आला.
आरोग्य हीच खरी संपत्ती असून त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. भौतिक संपत्ती कमावण्याच्या नादात परमेश्वराने दिलेल्या अमूल्य अशा आरोग्यरुपी संपत्तीकडे वेळ द्यायला साध्या कोणाकडे वेळ नाही. सध्याची फास्ट लाईफ आणि फास्ट फूड यांच्या नादात माणसाचे आरोग्य देखील फास्ट निघून जात आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून थेट आरोग्य विभाग आपल्या दारी आले आहे. आरोग्य विभागामार्फत राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Subscribe










