सिंधुदुर्गच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी घेतले आरवलीच्या श्री. देव वेतोबाचे दर्शन

देवस्थान समितीचे अध्यक्ष जयवंत राय यांनी केले स्वागत

आरवली : जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी सहकुटुंब आरवलीच्या श्री. देव वेतोबाचे दर्शन घेतले. यावेळी श्री. देव वेतोबा देवस्थान समितीचे अध्यक्ष जयवंत राय यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी त्यांनी श्री. देव वेतोबा देवस्थानची महती आणि पूर्वेतिहास जाणून घेतला. श्री. देव वेतोबा देवस्थानला तीर्थक्षेत्र विकास योजनेत ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच वेतोबाच्या दर्शनाने मन प्रसन्न झाल्याचे सांगितले. श्री. देव वेतोबा देवस्थानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय कामाची सविस्तर माहिती अध्यक्ष जयवंत राय यांनी त्यांना दिली. यावेळी देवस्थान समितीने राबवलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांनी कौतुक केले. तसेच ‘ब’ वर्गातील उर्वरित कामाबद्दल सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी श्री. देव वेतोबा देवस्थान समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी देवस्थान समितीचे सचिव आबा टाककर, डॉ. शैलेंद्र नाईक, मा. पोलिस पाटील मधुसूदन मेस्त्री, ग्रामसेवक केतन जाधव, लिपिक बाबू, रमण शेलटे आदी उपस्थितीत होते.

error: Content is protected !!