२१ दिवसांच्या सहवासानंतर बाप्पांना भावपूर्ण निरोप

पिंगुळीत भक्तिमय वातावरणात विसर्जन.

ढोल-ताशांच्या गजरात ‘बाप्पा मोरया’चा जयघोष.

केतन शिरोडकर /पिंगुळी

पिंगुळी येथे २१ दिवस विराजमान असलेल्या श्री गणरायाला रविवारी भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बाप्पांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या तालावर तरुणाईसह भाविकांनी नाचत-गाजत आनंद व्यक्त केला. पारंपरिक वाद्यांचा निनाद, गणरायाच्या जयघोषाने आणि भक्तांच्या उत्साहाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

तब्बल २१ दिवस गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा आणि सेवा केल्यानंतर विसर्जनाची वेळ येताच भाविक भावुक झाले. बाप्पांना निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
भक्ती, उत्साह आणि पारंपरिक संस्कृतीचा सुंदर संगम घडवत २१ दिवसांच्या गणपती बाप्पांचे विधिवत विसर्जन करण्यात आले

error: Content is protected !!