तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या अन्यथा सरकार विरोधात तीव्र आंदोलन- वैभव नाईक
सरकारने पंचनामे करण्याचे आदेश देऊनही सिंधुदुर्गात पंचनामे सुरू न झाल्याने व्यक्त केली नाराजी
भात शेतीला पुरेसा पाऊस न पडल्याने आणि तीव्र स्वरूपाच्या उन्हामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात शेती करपून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानीकडे सरकार गांभीर्याने पाहत नसून शेतकरी हवालदिल झाला असल्याने आज कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील पावशी आणि माणगाव येथे नुकसानग्रस्त भात शेतीची पाहणी केली. राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश देऊनही सिंधुदुर्गात अद्याप भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरु न झाल्याने मा.आ. वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त केली.सरकारने तातडीने सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अन्यथा शेतकऱ्यांसमवेत सरकार विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी वैभव नाईक यांनी दिला.
याप्रसंगी पावशी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर, जि. प. सदस्य गंगाराम सडवेलकर, माजी उपसभापती जयभारत पालव, सुशील चिंदरकर, बाळू पालव, पावशी उपसरपंच लक्ष्मीकांत तेली, ग्रा.प.सदस्य काका भोगटे, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत कुंभार, मनीष तोटकेकर, दादा खोत, बंड्या खोत,बाबू वायंगणकर,प्रसाद शेलटे,अमित राणे,सचिन ठाकूर,शैलेश काळप, पावशी येथील शेतकरी जयराम वराडकर, न्हानु तोटकेकर, राजन तवटे, किशोर तवटे आदी उपस्थित होते.
तर माणगाव कुंभारवाडी येथे शेतकरी पांडुरंग कुंभार आणि माणगाव कोठीची राई येथे शेतकरी हर्षद धुरी, सुभाष धुरी, उमेश देसाई यांच्या शेतीची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, पंचायत समिती सदस्य, गटनेते योगेश धुरी, माणगाव सरपंच सौ मनीषा भोसले, उपसरपंच बापू बागवे, शिवसेना विभाग प्रमुख एकनाथ धुरी, उपविभाग प्रमुख शैलेश शिरोडकर, नानेली ग्रा.पं. सदस्य विनय कदम, माणगाव ग्रा.प.सदस्य संदीप सावंत ईश्वरी सावंत, काजल नाईक, बंटी भिसे आदी उपस्थित होते.
1
/
112
kudal | पुढच्या वर्षीपर्यंत आमच्या निलेश साहेबांका मंत्रिपद मिळांदेत रे महाराजा... | Nilesh Rane
Kudal | माझा भाऊ मंत्री म्हणजे मीच मंत्री | Nilesh Rane #nileshrane
ओंकार हत्तीवर फेकली पेटती मशाल ? #omkarhatti #sawantwadi
sindhudurg | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला वनराई बंधारा अणाव येथे - मकरंद नाईक
Sindhudurg | सिंधुदुर्गात १० हजार कच्चे बंधारे बांधणार - दादा साईल
Kudal | मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे सेना आक्रमक | vaibhav naik #vaibhavnaik
Datta Mandir | माणगावच्या दत्त मंदिरात भक्ताला आलेला अद्भुत अनुभव ! | Sindhudurg
Sindhudurg | “भातशेतीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे थेट शेतात” | Nitesh Rane
Sindhudurg | सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सर्व ताकद पणाला | Nitesh Rane
मुंबई सोडणार का ग्रामस्थ? बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात चर्चा | mumbai | Ganesh visarjan
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
1
/
112


Subscribe







