जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वात घेतली महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट
कुडाळ : वाढीव वीज बिलाविरोधात कवठी ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वात त्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांची भेट घेतली. यावेळी वाढीव वीजबिल संदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी रुपेश पावस्कर यांनी स्मार्ट मीटर व वाढीव वीज बिलासंदर्भात ग्रामस्थांच्या तक्रारी मांडल्या. तसेच ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन झाल्याशिवाय स्मार्ट मीटर बसू नयेत अशा सूचना अधीक्षक अभियंत्यांना दिल्या. अधीक्षक अभियंत्यांनी देखील या सर्व सूचना मान्य केल्या. यावेळी जनतेच्या हितासाठी कायम लढत राहणार असल्याचे रुपेश पावस्कर यांनी सांगितले.
यावेळी मंगेश बांदेकर, रुपेश वाडयेकर, नंदकिशोर वाडयेकर, राजन खोबरेकर, सुहास खोबरेकर, गोकुळ तोरस्कर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.