मा.आ.वैभव नाईक यांच्यासह सावंतवाडी मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी उपवनसंरक्षकांची भेट घेत दिला इशारा
हत्ती हटाव मोहिमेसंदर्भात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांनी आज सावंतवाडी वनविभाग कार्यालयात उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा यांची भेट घेतली. दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात हत्तींकडून होणारा उपद्रव रोखण्यासाठी येणाऱ्या महिनाभरात हत्ती हटाव मोहीम राबविली नाही तर शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करू असा इशारा यावेळी वैभव नाईक यांनी दिला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना मा.आ. वैभव नाईक म्हणाले, गेले तीन चार वर्षे दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यात हत्ती धुमाकूळ घालत आहेत. सत्ताधारी वारंवार हत्ती हटाव मोहीम राबविण्याची आश्वासने देत आहेत. परंतु आज आम्ही सावंतवाडी उपवनसंरक्षक यांच्याकडे चौकशी केली असता हत्ती हटाव मोहीमेला कोर्टाने स्टे दिल्याचे त्यांनी सांगितले. परंतु आश्वासने देणाऱ्यांनी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोर्टाचा स्टे उठविण्यासाठी कोणत्याही हालचाली केल्या नाहीत.ओंकार हत्तीने मोर्ले येथे एका शेतकऱ्याचा देखील बळी घेतला आहे. त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी महिन्याभराच्या आत त्या हत्तीला पकडण्याच्या आदेशाचे पत्र देऊन तशी ग्वाही दिली होती. परंतु त्याला दीड वर्ष झाले तरी हत्ती पकडला गेला नाही. हे हत्ती शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करीत आहेत. त्याचबरोबर ते लोकवस्तीत येत असल्याने पुन्हा मनुष्यहानीचा देखील धोका निर्माण झाला आहे.माणगाव मध्ये असेच हत्ती धुमाकूळ घालत असताना त्यावेळी आम्ही यशस्वीपणे हत्ती हटाव मोहीम राबविली होती. येणाऱ्या महिन्याभरात सावंतवाडी मतदारसंघात कोर्टाचा स्टे उठवून हत्ती हटाव मोहीम राबविली गेली नाही तर शिवसेनेच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाणार आहे. हत्ती प्रश्नासाठी दोडामार्ग तालुक्यातील पाळये गावातील नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. त्या उपोषणाला देखील शिवसेनेचा पाठींबा असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.
यावेळी सावंतवाडी विधानसभाप्रमुख रुपेश राऊळ, विधानसभा संघटक बाळा गावडे, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, सावंतवाडी तालुकाप्रमुख राजेश शेटकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, कुडाळ उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर, दोडामार्ग शहरप्रमुख चंदन गावकर, कुडाळ शहर निरीक्षक सुशील चिंदरकर, दोडामार्ग युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, उपतालुकाप्रमुख संदेश राणे, मणेरी विभागप्रमुख प्रदीप सावंत, सिद्धेश राणे आदि उपस्थित होते.
1
/
112
कणकवली मधील संभाव्य पाणी टंचाई बाबत समीर नलावडे यांची पत्रकार परिषद*काय म्हणाले नलावडे सविस्तर पहा
kudal | योगेश मोबाईल शॉपी मध्ये मोबाईल घ्या आणि मिळवा थार जिंकण्याची संधी #mobileoffer #mobile
kudal | पुढच्या वर्षीपर्यंत आमच्या निलेश साहेबांका मंत्रिपद मिळांदेत रे महाराजा... | Nilesh Rane
Kudal | माझा भाऊ मंत्री म्हणजे मीच मंत्री | Nilesh Rane #nileshrane
ओंकार हत्तीवर फेकली पेटती मशाल ? #omkarhatti #sawantwadi
sindhudurg | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला वनराई बंधारा अणाव येथे - मकरंद नाईक
Sindhudurg | सिंधुदुर्गात १० हजार कच्चे बंधारे बांधणार - दादा साईल
Kudal | मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे सेना आक्रमक | vaibhav naik #vaibhavnaik
Datta Mandir | माणगावच्या दत्त मंदिरात भक्ताला आलेला अद्भुत अनुभव ! | Sindhudurg
Sindhudurg | “भातशेतीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे थेट शेतात” | Nitesh Rane
Sindhudurg | सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सर्व ताकद पणाला | Nitesh Rane
मुंबई सोडणार का ग्रामस्थ? बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात चर्चा | mumbai | Ganesh visarjan
1
/
112


Subscribe







