श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान प्रवर्तक जागृत नाशिक भारत अभियानचे अध्यक्ष स्वामी श्री. कंठानंद यांचे प्रतिपादन
‘कर्तृत्ववान स्त्रीशक्ती – उद्योगिनी महाराष्ट्राची’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथे संपन्न
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवउद्योजिकांचा केला सन्मान
कुडाळ : महिला केवळ रोजगार मागणारी नसून रोजगार उपलब्ध करून देणारी उद्योजक बनावी.आपला जो प्रवास आहे तो सामाजिक कार्यापासून सेवेपर्यंत असला पाहिजे .कर्मापासुन कर्मयोगापर्यंत असला पाहिजे तुमच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे, ती ऊर्जा एक्सपोल्ट करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वतःसोबत बसणे आवश्यक आहे असे प्रतिपादन श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान प्रवर्तक जागृत नाशिक भारत अभियानचे अध्यक्ष स्वामी श्रीकंठानंद यांनी केले. नाशिकच्या भूमीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ नवउद्योजिकांना राज्यस्तरीय कर्तुत्ववान स्त्री शक्ती उद्योगिनी महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त संजीवन उद्योग समूहाच्या वतीने आयोजित ‘कर्तृत्ववान स्त्रीशक्ती – उद्योगिनी महाराष्ट्राची’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा तसेच आरोग्य विभागांतर्गत फिरता दवाखाना लोकार्पण सोहळा रेशीमगाठी लॉन्स,सातपूर बसस्थानकाजवळ, नाशिक येथे उत्साहात शुक्रवारी सायंकाळी पार पडला.या सोहळ्याला स्वामी कंठानंद श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक, महंत शंकरानंद सरस्वती, त्र्यंबकेश्वर, वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी, संस्थापक महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान नाशिक, सेवाभावी संस्था प्रबोधन समिती तथा संस्थापक अध्यक्ष, कल्याणी संस्थेच्या राज्य अध्यक्ष,डॉ. सुनिता मोडक,महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संतोष मंडले संस्थापक अध्यक्ष आश्रय प्रतिष्ठान कुडाळ माधव गोरे. धर्मादाय आयुक्तालय, अॅड. भाऊसाहेब गंभीरे सहाय्यक धर्मदाय आयुक्त अनामिका मोताळे मणीकर्णिका लघुउद्योग शिवणकाम केंद्राच्या महिला उद्योजिका उन्मेषा दाभोलकर डॉ. संजय धुर्जड संतोष फसाटे, नयना पाटील, नंदिनी रामचंदानी,सतीश पाथरुड उमेश दाभोलकर मंगेश राऊत मंथन गवस हरेश घाडी गोविंद जळवी सतीश केसरकर दिपेश मांजरेकर ओंकार पाटील यश मार्गी तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून सिंधुदुर्गसह कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, परभणी, मुंबई, पुणे यांसह विविध जिल्ह्यांतून सेवाभावी संस्था प्रबोधन समिती, संजीवन उद्योग समूह व रणरागिणी सहभागी झाल्या होत्या.या कार्यक्रमात सिंधुदुर्गसह सुमारे ८० कर्तृत्ववान रणरागिणींचा ‘उद्योगिनी महाराष्ट्राची’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या तसेच उद्योग व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
स्वामी कंठानंद म्हणाले,आपला समाज हा उथळ आहे कोणत्याही प्रश्नांचा शोध घ्यायचा असेल तर मुळाशी गेल पाहिजे तुम्ही भारतात जन्माला आलात भाग्यवान आहात ,पण ज्यांना भारत असून कळलेला नाही हे दुर्भाग्य आहे असे सांगून भारत समजून घ्या आपले जीवन प्रकाशित करा असे सांगून कलाकार वेगळा असतो मनोरंजनकार हा कलाकार नसतो कला ही जीवनाचा उत्कर्ष करते तर मनोरंजन जीवनाला पतनाकडे नेते असे सागुन या सोहळ्याला आशिर्वाद दिले
डॉ. सुनिता मोडक यांनी महिलांनी रोजगारासाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः रोजगार निर्माण करावा, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे महाराष्ट्रातील महिलांना उद्योग व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.
महिलांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना उद्योजक बनविण्याचा संजीवन उद्योग समूहाचा प्रयत्न असून, आतापर्यंत महाराष्ट्रातील हजारो महिलांना उद्योजकतेच्या प्रवाहात आणण्यात आल्याचे सांगितले.
उन्मेषा दाभोलकर यांनी छोट्या छोट्या व्यवसायातून महिला सबलीकरण व्हावे महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावी या अनुषंगाने सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे सुरू झालेल्या शिवणकाम रोजगार अंतर्गत मोहिमेचा शुभारंभ डॉ सुनीता मोडक यांच्या उपस्थितीत झाला होता आणि राज्यातून हा उपक्रम राबविणारा आपला सिंधुदुर्ग जिल्हा पहिला ठरला असे सागितले
गौरव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवउद्योजिकांचा
या सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवउद्योजिका महिलांना राज्यस्तरीय कर्तुत्ववान स्त्री शक्ती उद्योगिनी महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामध्ये जेष्ठ महिला उद्योजिका श्रीमती रेश्मा जळवी ,उन्मेषा दाभोलकर, स्वाती पेडणेकर ,मृणाल सावंत , कीर्ती पाटील, पुजा कुडव, सानिका सावंत, श्रुती केसरकर, स्वप्नाली जळवी ,दर्शना धुरी,दर्शना मार्गी , प्रियांका सुकाळे ,वृंदा राऊत, रोहिणी घाडी,यांचा समावेश होता.
यावेळी आश्रय प्रतिष्ठान कुडाळचे अध्यक्ष जेष्ठ उद्योजक माधव गोरे, सतीश पाथरुड यांचासुद्धा सन्मान करण्यात आला


Subscribe










