कुडाळवासियांच्या आयुष्यात ‘आनंद’ फुलवणारी – प्राजक्ता

कुडाळ नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर “वाढदिवस विशेष”

आमदार श्री.निलेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाने
नगराध्यक्ष मॅडमच्या कर्तृत्वाने,
बदलले कुडाळ शहराचे रूप सुंदर,

गुळगुळीत झाले रस्ते आता,
प्रवासाला मिळाली नवी दिशा,
उजळले रस्ते लखलखत्या प्रकाशाने
दूर झाली अंधाराची दाट निशा.

गणेश घाटाचा कायापालट झाला,
भक्ती आणि सौंदर्याचा सुंदर संगम,

नमो उद्यानाच्या हिरवळीत फुल्ले,
आनंदाने नटलेले पप्रत्येकी मन.

नाना-नानी पार्कमध्ये हास्य फुलले,
जेष्ठांना मिळाला विसाव्याचा आधार,
गप्पा-गोष्टी अन् नव्या आठवणींनी,
आनंदी झाला प्रत्येक परिवार.

नाट्यगृहाच्या भव्य वास्तूने,
कलेला दिला नवा सन्मान,
संस्कृती अन् कलेचा जपून वारसा,
वाढवले कुडाळ शहराचे उंच मान.

अहोरात्र मेहनत अन् भक्कम ध्येय,
हाच आपल्या कार्याचा ध्यास,
नगराध्यक्ष मॅडमच्या नेतृत्वाने,
कुडाळ शहराचा होतोय सर्वोत्कृष्ट विकास!

शब्दांकन : लवू कदम

error: Content is protected !!