पावशी, मुळदे येथे मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ
दुष्काळाच्या संकटात पाण्याचे साठे निर्माण करण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसैनिकांच्या श्रमदानातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० वनराई कच्चे बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ आज पावशी, मुळदे येथे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. त्याबद्दल तेथील ग्रामस्थांनी वैभव नाईक व शिवसैनिकांचे आभार मानले.
यावेळी मा.आ. वैभव नाईक म्हणाले, चालू वर्षी पावसाचे प्रमाण कमालीचे घटल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काळात पाण्याचा तुटवडा भासणार असल्याने नागरिकांना आवश्यक पाण्याचे साठे निर्माण करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यामातून १०० वनराई कच्चे बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामध्ये आज दोन ठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. शिवसेना नेहमीच ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या ब्रीद वाक्याप्रमाणे कार्यरत असून सामाजिक भावनेतून हा उपक्रम होत असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.
याप्रसंगी पावशी येथे शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर, जि. प. सदस्य गंगाराम सडवेलकर, पंचायत समिती सदस्य,गटनेते योगेश धुरी,अमित राणे, उपविभाग प्रमुख सचिन ठाकूर, पावशी उपसरपंच लक्ष्मीकांत तेली,माणगाव उपसरपंच बापू बागवे, मनीष तोटकेकर, बाबू वायंगणकर, राजन तवटे, शैलेश घाडी, जयराम वराडकर, प्रसाद शेलटे,बाबा पावसकर,बाबा खोत, मुळदे येथे उपसरपंच प्रवीण पालव, भिवा पालव, माजी सरपंच संजय पालव, ग्रा.पं. सदस्य अपूर्वा पालव, शशिकांत पालव आदी उपस्थित होते.
1
/
112
kudal | पुढच्या वर्षीपर्यंत आमच्या निलेश साहेबांका मंत्रिपद मिळांदेत रे महाराजा... | Nilesh Rane
Kudal | माझा भाऊ मंत्री म्हणजे मीच मंत्री | Nilesh Rane #nileshrane
ओंकार हत्तीवर फेकली पेटती मशाल ? #omkarhatti #sawantwadi
sindhudurg | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला वनराई बंधारा अणाव येथे - मकरंद नाईक
Sindhudurg | सिंधुदुर्गात १० हजार कच्चे बंधारे बांधणार - दादा साईल
Kudal | मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे सेना आक्रमक | vaibhav naik #vaibhavnaik
Datta Mandir | माणगावच्या दत्त मंदिरात भक्ताला आलेला अद्भुत अनुभव ! | Sindhudurg
Sindhudurg | “भातशेतीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे थेट शेतात” | Nitesh Rane
Sindhudurg | सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सर्व ताकद पणाला | Nitesh Rane
मुंबई सोडणार का ग्रामस्थ? बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात चर्चा | mumbai | Ganesh visarjan
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
1
/
112


Subscribe







