तुळसुली येथे कच्चा बंधारा क्र. २ यशस्वीरित्या पूर्ण

रोटरी क्लब ऑफ कुडाळ, ग्रामपंचायत तुळसुली आणि लिंगेश्वर विद्यालय तुळसुली यांचा संयुक्त उपक्रम

रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या पुढाकाराने, तुळसुली ग्रामपंचायत तुळसुली आणि लिंगेश्वर विद्यालय तुळसुली यांच्या सौजन्याने तुळसुली येथे कच्चा बंधारा क्र. २ यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला.

दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर उपाय म्हणून उभारलेला हा बंधारा शेतकरी, ग्रामस्थ आणि परिसरातील निसर्गासाठी पाण्याचा शाश्वत स्रोत निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि रोटरी सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून साकारलेला हा उपक्रम म्हणजे सामूहिक प्रयत्नांची सुंदर उदाहरण आहे.

error: Content is protected !!