डिगस श्री काळंबा देवीचा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम!

कुडाळ : डिगस गावची ग्रामदेवता श्री काळंबा (कालिका) देवीचा प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा शनिवार दि. 10 ते सोमवार दि.12 मे दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.


यात शनिवार दि. 10 मे रोजी सकाळी 7 वा. देवीची विधीवत पूजा, 8 वा. देवीची पालखी व तरंग सजविणे, 9 वा. श्री देव लिंग, श्री काळंबा (कालिका) देवी पंचायतन अभिषेक, दुपारी 3 वा. स्थानिक भजने, सायं. 5 वा. हरिपाठ, 6 वा. किर्तनकार प्रशांत धोंड यांचे कीर्तन, रात्री 8 वा. लहान मुलांचे व महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, 10 वा. जिल्हास्तरीय वेशभूशा स्पर्धा (लहान व मोठा गट), रविवार 11 मे रोजी सकाळी 7 वा. श्रींची विधीवत पूजा, 8 वा. होमहवन, दुपारी 12 वा. आरती, 1 वा. महाप्रसाद, 3 वा. स्थानिक भजने, सायं 5 वा. हरिपाठ, रात्री 8 वा. जिल्हास्तरीय गायन स्पर्धा (भावगीत व भक्तिगीत), सोमवार दि. 12 मे राजी सकाळी 8 वा. श्रींची विधीवत पाद्यपूजा व अभिषेक, 9 वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 12 वा. आरती व तीर्थप्रसाद, 1 ते 3 वा. महाप्रसाद, 3 वा. श्री कला सानिध्य प्रस्तूत सुमधुर गीतांचा कार्यक्रम, स्वरांजली व हिंदू सनातन संस्था प्रवचन, सायं. 5 वा. हरिपाठ, 7 वा. संदेश कसबले यांचे भजन, रात्री 8 वा. श्री काळंबा देवी मंडळाचे समईनृत्य, 9 वा. दिंडी भजन (चुनवरे), 11 वा. पालखी सोहळा, 12 वा. ग्रामदेवता दशावतार नाटय मंडळाचा नाटयप्रयोग होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समिती, गावकर व डिगस ग्रामस्थांनी केले आहे.

error: Content is protected !!