आज सिंधुदुर्ग जिल्हा महसूल विभागाच्या कामकाजाबाबत महत्वपूर्ण आढावा बैठक पालकमंत्री या नात्याने जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली.
जिल्हा प्रशासनाचे प्रत्येक कार्यालय लोकाभिमुख झाले पाहिजे. कामाच्या वेळेला शंभर टक्के काम द्या. जनतेला त्रास होईल अशा फेऱ्या माराव्या लागता कामा नयेत. सरकारची प्रतिमा तुमच्या महसूल खात्यामुळेच वाढते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी शभर टक्के सहभाग द्या. एकही काम पेंडिंग राहता नये. याची काळजी द्या. जनतेला तालुक्यात आणि जिल्हात दाखले आणि प्रलंबित कामांसाठी फेऱ्या माराव्या लागता कामा नये. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक महसूल स्थरावर झाली पाहिजे. भविष्यात नवनवीन उद्योग येणार आहेत. अधिकारी म्हणून तुमचे योगदान महत्वाचे आहे. आम्ही लोकप्रतिनिधी येथील जनतेच्या सेवेसाठी आहेत. १०० टक्के येथील जनतेसाठी आम्ही वाहून घेतले आहे. त्यामुळे जनतेचा विकास झाला पाहिजे. लोकाभिमुख कार्यालय म्हणजे तहसील आणि महसूल चे कार्यालय असे नावारूपास आले पाहिजे असे काम करा. अशा सूचना बैठकीत दिल्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी अनिल पाटील, सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसीलदार सर्व महसूल खातेप्रमुख उपस्थित होते.