कुडाळ : जि.प.प्राथमिक शाळा डिगस शारदा विद्यालय या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीमार्फत दिनांक २२/०१/२०२५ ते २३/०१/२०२५ या कालावधीत बालमहोत्सव २०२५ अशा प्रकारच्या अनोख्या कार्यक्रमाचे जिल्ह्यात प्रथमच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आवळेगाव केंद्रामधील ११ शाळांचा समावेश होता. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत ज्ञानी मी होणार, कथाकथन, गीतगायन, रंगभरण, श्रुतलेखन इ.चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाट्न डिगस ग्रामपंचायत सरपंच सौ. पूनम पवार, उपसरपंच श्री. रुपेश पवार, आवळेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. भिकाजी तळेकर सर,माजी जि. प. सदस्य श्री. अमरसेन सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. उदय परब, उपाध्यक्ष श्री. समीर चेऊलकर, यजमान शाळा मुख्याध्यापक श्री. संदीप देसाई, सहशिक्षक अरविंद आईर, तसेच डिगस राणेवाडी शाळा मुख्याध्यापक श्री. प्रविण खरात, सहशिक्षक श्री. अभिजित डेकाटे,आवळेगाव गावडे कट्टा मुख्याध्यापक श्री. शिवराम तावडे , श्री. संजयकुमार घाडीगावकर , शिक्षणतज्ज्ञ तांबे गुरूजी, शैलेश घोगळे उपस्थित होते. तसेच पालकवर्ग श्री. तुकाराम पवार,श्री. सुहास परब, श्री. दिपक पाताडे,श्री. उमेश चेऊलकर, श्री. संजय गावडे, श्री.सतिश पवार देखील उपस्थित होते. निमंत्रित प्रमुख पाहुणे अडव्होकेट श्री. सुहास सावंत, डिगस हायस्कूल माजी मुख्याध्यापक श्री. दिपक आळवे, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कडावल चे उपव्यस्थापक श्री. दिवाकर प्रसाद,प्रदीप चेऊलकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे खास आकर्षण शाळेत रेखाटलेल्या सेल्फी पॉईंट ठरला.













