शिकेल तोच स्पर्धेत टिकेल – सदानंद रावराणे

वैभववाडी : मानवी विकासामध्ये शिक्षणाचे खुप मोठे महत्त्व आहे. आजच्या काळात शिक्षण तळागाळापर्यंत पोचले असले तरी उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. शिकेल तोच स्पर्धात्मक युगात टिकेल असे मत महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.सदानंद रावराणे यांनी महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले. वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा ३२ वा. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दि.१८ जानेवारी रोजी कार्याध्यक्ष श्री.सदानंद रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव श्री.शैलेंद्र रावराणे, श्री.सहसचिव विजय रावराणे, विश्वस्त श्री. प्रभानंद रावराणे, श्री.शरदचंद्र रावराणे, स्थानिक समिती अध्यक्ष श्री. सज्जनकाका रावराणे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, उपप्राचार्य डॉ. एम.आय. कुंभार, कार्यालयीन अधीक्षक श्री.संजय रावराणे, जिमखाना विभागप्रमुख प्रा.सचिन पाटील व सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डी. एस. बेटकर उपस्थित होते. या कार्यक्रमात हेमंत युवा सांस्कृतिक महोत्सव व हेमंत क्रीडा महोत्सवात पार पडलेल्या विविध स्पर्धा प्रकारात यशस्वी विद्यार्थीना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक व अहवाल वाचन प्र. प्राचार्य एन. व्ही. गवळी यांनी केले. याचबरोबर विद्यार्थी विशेष गौरव सोहळा पार पडला. यामध्ये महाविद्यालयाचा आदर्श विद्यार्थी कु. तुषार चंद्रकांत पार्टे, आदर्श विद्यार्थीनी कु. प्रियांका गणेश जेठे तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून कु. साहिल संतोष नर विद्यार्थीनी कु. प्रगती राजेंद्र तावडे यांचा गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमात विशेष योगदान देणाऱ्या प्राद्यापकांचा सन्मान सोहळा व आंतरराष्ट्रीय परिषदेच्या शोध निबंध संग्रहाचे विमोचन करण्यात आले. यावेळी अथक परिश्रम केल्याने यश प्राप्त होते असे श्री. प्रभानंद रावराणे यांनी सांगितले. समाजामध्ये असंख्य संधी उपलब्ध असतात त्या ओळखून निगडित कौशल्य विकासावर भर द्यावा. स्वतः सक्षम बनावे असे आवाहन शैलेंद्र रावराणे यांनी केले.


अध्यक्षीय मनोगतात रावराणे यांनी सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आवश्यक असून शिक्षणाने कुटुंबाचा व समाजाचा विकास होतो. वैभववाडी तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर आपल्या करिअरकडे लक्ष दिले पाहिजे असे सांगितले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन क्रीडा विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या सर्व सदस्यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आभार जिमखाना विभागप्रमुख प्रा.सचिन पाटील यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजीवनी पाटील व प्रा.निलेश कारेकर यांनी केले.

error: Content is protected !!