सावंतवाडी : कोलगाव येथील आयटीआयमध्ये शिकणारा हुमरस न्हावीवाडी येथील १९ वर्षीय गणेश प्रकाश नायर या युवकांने काजूच्या झाडाला नायलॉनच्या दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही आत्महत्या का केली याबाबत अद्याप कारण समजून आलेले नाही दरम्यान याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हुमरस न्हावीवाडी येथे राहत असलेला १९ वर्षीय गणेश नायर हा युवक आयटीआय मध्ये शिकत आहे आज मंगळवारी तो घरी आल्यानंतर त्यांचे शेजारी राजाराम लाड यांच्या आईला सांगितले की, बैल आणायला जातो आणि त्यांनी घराच्या पडवीतील नायलॉन दोरी घेऊन तो निघून गेला तो उशिरापर्यंत घरी परतला नाही. दरम्यान त्याचा मावस भाऊ मंगेश धोत्रे हा त्याच ठिकाणी राहतो हा बाजारातून घरी आल्यावर राजाराम लाड त्याच्या आईने गणेश नायर हा बैल आणायला जातो असे सांगून गेला तो अद्याप आलेला नाही असे सांगितल्यावर मावस भाव मंगेश धोत्रे व गणेश नायरचे वडील त्याला शोधण्यासाठी गेले असता राजाराम लाड यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या काजूच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास लावलेल्या स्थितीत गणेश नायर हा युवक आढळून आला त्याने ही आत्महत्या का केली याबाबत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.














 
	

 Subscribe
Subscribe









