आ. निलेश राणेंची बुलंद तोफ – सलमान गांगु

वाढदिवस अभिष्टचिंतन

कोकण म्हणजे राणे…आणि राणे म्हणजेच कोकण… हे समीकरण अवघ्या महाराष्ट्राला अवगत आहे. कोकणची गाडी प्रगतीच्या योग्य ट्रॅकवर आणण्यासाठी राणे कुटुंबाने मोलाचे योगदान दिले आहे. गेली अनेक दशके राणे कुटुंब कोकणवासीयांची अविरतपणे सेवा करत आहे. या प्रवासामध्ये अनेकांनी राणे कुटुंबाला साथ दिली. यातीलच एक नाव मात्र प्रामुख्याने घ्यावे लागेल ते नाव म्हणजे आ. निलेश राणे कट्टर समर्थक सलमान गांगु यांचे.

सलमान गांगू सध्या राणे प्रतिष्ठान वैद्यकीय प्रमुख महाराष्ट्र राज्य या पदावर कार्यरत आहेत. सलमान हे मुंबई येथे जरी कार्यरत असले तरी त्यांचे मूळगाव रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आहे. त्यामुळे कोकणच्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली आहे. राणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी मुंबईसह कोकणातील अनेकांच्या लाखो रुपयांच्या शस्त्रक्रिया अगदी मोफत करून दिल्या आहेत. अनेकांना नवसंजीवनी देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना मुंबई येथे बेस्ट मेडिकल सोशल वर्करचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. राणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून नकळत का होईना पण अनेकांचे अश्रू पुसण्याचे काम त्यांनी केले आहे.

अगदी उन, वारा, पाऊस काहीही असूद्या गेली अनेक वर्षे ते राणे कुटुंबाच्या सुख – दुःखात अगदी सावलीप्रमाणे सोबत आहेत. विरोधकांना सळो की पळो करुन सोडणारे निलेश राणे यांची सोशल मीडियाची बुलंद तोफ अशी त्यांची सर्वत्र ओळख आहे. असे आ. निलेश राणे यांचे हक्काचे शिलेदार कट्टर राणे समर्थक सलमान गांगु यांचा आज वाढदिवस ! त्यांच्या कर्तृत्वाची पताका अशीच फडकत राहो. त्यांच्या हातून अशीच कोकणवासीयांची सेवा घडत राहो. त्यांच्या वाढदिवशी त्यांना सिंधुदर्पण न्युज चॅनेलकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

error: Content is protected !!