कुडाळ : बुधवार दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी बामणादेवी मित्र मंडळ आणि ग्रामस्थ घावनळे यांच्या वतीने देवस्थान येथे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
या दिवशी विविध धार्मिक तसेच करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सकाळी ९ वा. – सत्यनारायण महापूजा सकाळी १२ वा. – आरती व तीर्थप्रसाद दुपारी १ वा. – महाप्रसाद दुपारी ३ वा. – महिलांच्या फुगड्या सायं. ४ वा. – सांस्कृतिक कार्यक्रम व रेकॉर्ड डान्स सायं ६ वा. – कीर्तन (ह. भ. प. श्री. अक्षय अरुण परुळेकर)
रात्रौ ७ वा. – गोफ नृत्य (शालेय मुले, कुडाळ, एम. आय. डी.सी.) रात्रौ ८ वा. – मुळपुरूष धावडेश्वर भजन मंडळ वेंगुर्ला (वारकरी भजन) रात्रौ ९.३० वा. – ग्रामस्थांचे भजन रात्रौ १० वा. – दत्तमाऊली दशावतार यांचा नाट्यप्रयोग देवी चंद्रलांबा परमेश्वरी
आदी कार्यक्रम होणार आहेत. तेव्हा सर्व भाविकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.