सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून विशेष जनजागृती अभियान यशस्वीरित्या संपन्न

सिंधुदुर्ग : सायबर गुन्हे करणारे गुन्हेगार दररोज नवनवीन युक्त्यांमधून नागरीकांची आर्थिक फसवणूक करीत असून तशी फसवणूक होऊ नये. अंमली पदार्थांच्या नशेच्या आहारी युवा पिढी जाऊ नये. नागरीकांना आपत्कालीन परिस्थितीत, गुन्हे घडल्यास तातडीची मदत मिळण्यासाठी असलेल्या डायल 112 हेल्पलाईनची माहिती व्हावी तसेच, महिला व बालकांची सुरक्षितता अबाधित राहून त्यांचेमध्ये सक्षमता यावी या व्यापक हेतूने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाकडून दि. 05 डिसेंबर 2024 ते दि. 27 डिसेंबर 2024 या मुदतीत सर्वसमावेशक जनजागृती अभियान राबविण्यात आले.

सदर अभियानामध्ये शाळा, कॉलेज, विविध शासकीय कार्यालये, पर्यटन स्थळे, सागरी किनारे, एस. टी. स्टैंड, वार्षिक जत्रोत्सव अशा विविध ठिकाणी तसेच महिला बचत गट, पोलीस पाटील संघटना, व्यापारी संघटना इत्यांदीना सायबर गुन्हेगार कशा प्रकारे गुन्हे करतात, त्यासाठी कोणकोणती दक्षता घ्यायची तसेच, अंमली पदार्थाची माहिती, त्यासंदर्भातील युवा पिढीचे वास्तव, अंमली पदार्थाच्या सेवनांमुळे होणारे दुष्परिणाम, डायल 112 हेल्पलाईनचा उपयोग कसा करायचा याबाबत व्याख्यान, शॉर्ट फिल्म्स, व्हिडिओ क्लिप्स, बॅनर्स, पत्रके, रॅली, पथनाट्य, रिल्स इत्यांदींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यामध्ये शाळकरी, कॉलेजवयीन मुले व इतर नागरीक असे मिळून सुमारे 25,000 नागरीकांमध्ये प्रत्यक्षरित्या संपर्क साधून व संपूर्ण जिल्हयात सोशल मिडीया, वृत्तपत्रे इत्यांदींच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात आलेली आहे. या अभियानामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलामार्फत निर्मित केलेले “खोड” व “ANYTIME 112” हे लघुचित्रपट दाखविण्यात आले. या अभियानामधून शाळा कॉलेजवयीन मुले, शिक्षक, पत्रकार, ज्येठ नागरीक, बचत गटांच्या महिला इत्यांदीच्या सकारात्मक प्रतिक्रिया प्राप्त झालेल्या आहेत. या अभिनामध्ये पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचेसह सिधुदुर्ग जिल्हयातील 13 पोलीस ठाणे व पोलीस अधीक्षक कार्यालयातील एकूण 30 पोलीस अधिकारी व 80 पोलीस अंमलदार यांनी पोलीस दलाची दैनंदिन कर्तव्ये सांभाळून सहभाग घेतला होता.

नागरीकांना आवाहन करण्यात येते की, सायबर गुन्हे घडू नयेत याकरीता सावधानता बाळगून कोणत्याही अनोळखी व्यक्तींचा फोन आल्यास योग्य खात्री केल्याशिवाय तसेच अनोळखी व्यक्तीच्या व्हिडीओ कॉलला प्रतिसाद देवू नये, कोणत्याही व्यक्तीस OTP शेअर करु नका, कोणतीही अनोळखी लिंक ओपन करु नका, कोणत्याही अनोळखी व्यक्तीने अॅप डाऊनलोड करण्यास सांगितल्यास ते अॅप डाऊनलोड करु नका. तसेच सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन क्र. 1930 किंवा cybercrime.gov.in यावर तसेच, सायबर पोलीस ठाणे सिंधुदुर्ग येथील दुरध्वनी क्र. 02362 – 228214 यावर संपर्क करा. तसेच, कोणताही गुन्हा घडत असल्यास, अपघात, आपत्कालीन घटना घडत असल्यास डायल 112 हेल्पलाईन या क्रमांकावर संपर्क साधावा. महिलांच्या तक्रारींच्या अनुषंगाने 8657222777, 8976004111 मोबाईल हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. अंमली पदार्थांविषयक काही माहिती मिळाल्यास ती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तसेच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना गोपनीय रित्या पुरवावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. असे या अभियानादरम्यान सांगण्यात आले.

error: Content is protected !!