नितेश राणेंचे मंत्रीपद म्हणजे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि विकासाच्या दिशेने नवे पर्व…



नितेश राणे यांचे मंत्रिपद हे सिंधुदुर्गसाठी संधीचे नवे पर्व ठरेल. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि विकासाच्या दिशेने त्यांनी घेतलेले निर्णय राज्यभर प्रेरणादायी ठरतील, असा विश्वासही शिवसेना उपनेते श्री संजय आग्रे यांनी व्यक्त केला.

“आक्रमक, अभ्यासू आणि खंबीर नेतृत्व सिंधुदुर्गच्या प्रगतीला दिशा देईल.” महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्याच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम घेत आहे. या सरकारमधील सिंधुदुर्ग जिल्ह्याला नवे नेतृत्व आणि प्रगतीचा वेगवान ध्यास मिळाला आहे.

आक्रमक आणि अभ्यासू कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे आमदार नितेश राणे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात सिंधुदुर्गचा नावलौकिक वाढवण्याचा ध्यास घेतला आहे. हिंदुत्वाचे रक्षक, कणखर नेतृत्व आणि लोकहिताचा ध्यास असलेले नितेश राणे हे जिल्ह्याच्या जनतेसाठी एक आश्वासक नेता ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा विकासाची नवी दिशा गाठेल, असा ठाम विश्वास शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी व्यक्त केला आहे.


नितेश राणे यांचे हिंदुत्ववादी विचार आणि आक्रमक भूमिकेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला नव्या उर्जेची प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विकासकामे वेगाने पूर्ण होतील. स्थानिक जनतेच्या प्रश्नांना न्याय देत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श ठरेल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नवे पर्व…
खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या समन्वयातून सिंधुदुर्ग जिल्हा विकासात राज्यभरात वेगळा ठसा उमटवेल, अशी खात्री संजय आग्रे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *