देवेंद्र फडणवीस सरकारच्या नव्या मंत्री मंडळात अनेक नव्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे. यात भाजपा, शिंदे सेनेसह अजित पवार राष्ट्रवादी या तिघांचाही समावेश आहे. नव्याना संधी देताना जुन्यांचे पुर्नवसन ही केले जाणार असल्याचे समजते. भाजप डोंबिवली आमदार रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पद तर शिंदे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनाही मोठी जबाबदारी देण्याच्या तयारीत आहेत. मात्र ती कुठली ते अद्याप स्पष्ट झाले नाही.
एकनाथ शिंदे यांनी पक्ष वाढीसाठी प्रत्येक विभागात मंत्री पद दिली आहेत. मात्र सेनेच्या बालेकिल्ल्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा मंत्री पद नाही. रत्नागिरी जिल्ह्याला दोन मंत्री पद मिळणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आमदार दीपक केसरकर यांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे समजते.