आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली

संतोष हिवाळेकर

संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी आईचा जत्रोत्सव दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी होत आहे.

या जत्रेला अनेक मंत्री व सेलिब्रिटी भेट देतात. तसेच महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भाविक येत असतात. त्यामुळे या जत्रला भक्तांची अलोट गर्दी होते.

यावर्षी आंगणेवाडीची जत्रा नेमकी कधी होणार ? याची उत्सुकता सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्राला लागून राहिली होती. अखेर सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी आंगणेवाडीच्या श्री. देवी भराडी आईचा जत्रोत्सव संपन्न होणार आहे.

error: Content is protected !!