मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा दुजोरा.
सिंधुदुर्ग : गेल्या लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्याच्या तुलनेत विधानसभा निवडणुकी मिळालेले अल्प मताधिक्य याचा विचार करता, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचे म्हणणे योग्यच वाटते. अशी प्रतिक्रिया मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिली आहे.
लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ व मालवण तालुक्यांमध्ये पक्षप्रवेशांचे धडाके लावले गेले ते आभासी पक्षप्रवेश ठरलेत की काय.?
मुळात हि एन्काऊंटर करणारी टिमच कार्यरत होती. आमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून तशा बातम्या पण समजत होत्या. निवडणूक निकालाच्या दुसर्या दिवशी एका पदाधिकार्यासोबत हा विषय पण आम्ही चर्चीला होता. तो आज पण पुरावा म्हणून आहे. पण आता चिंदरकरांच्या जाहीर प्रेसमुळे याला दुजोरा द्यावासा वाटला.
2019 ला फुल फ्लेश काम करणारी मंडळी 2024 च्या निवडणुकीत डिम होती. प्रचार यंत्रणेत अंग राखून होती. काही विशिष्टांकरवी व्हाट्सअँपवर विरोधी मोहीम राबवली जात होती. बाजुच्या जिल्ह्याच्या प्रचार यंत्रणा तेथील उमेदवार हे महत्वाचे वाटत होते. अशा पण सर्व चर्चा ऐकु येत होत्या. भविष्यात हि जागा रिकामी राहील्यास आपल्या – आपल्या माणसाचा नंबर इथे लागु शकेल अस पण काही मंडळींचे मत होते. योग्य उमेदवारालाच मतदान करा हा !! अशी फोनाफोनी केल्याच्या घटना सुद्धा समजत होत्या .
एकंदरीत समर्थकांच्या मनामधे चलबिचलपणा करुन कोण, कोण संधी शोधतोय ? हे शोधुन काढणे हे चिंदरकर यांच्या आरोपांमुळे आता महत्वाचे झाले आहे. राणेंचे वलय वापरुन आता ही टिम आपल्या माणसांसाठी वेगळे लॉबिंग आणि राणेंसाठी वेगळे लॉबिंग करते.
याचा अभ्यास आता महायुतीतील सर्वांनीच करावा असे मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी म्हटले आहे.













