सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३ व ४ डिसेंबर रोजी यलो अलर्ट

कुडाळ प्रतिनिधी: फेंगल चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यावर देखील पडणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३ व ४ डिसेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आलेला असून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची, ३० ते ४० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची व गडगडाट होवून विजा चमकण्याची शक्यता जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून वर्तविण्यात आलेली आहे.

फेंगल चक्रिवादळाचा समुद्रकिनारपट्टीलगतच्या भागांवर मोठा परिणाम

मागच्या २४ तासात पुन्हा थंडीचा जोर ओसरला आहे. फेंगल चक्रिवादळाचा धोका कमी झाला असला तरी त्याचे परिणाम अजूनही हवामानावर दिसून येत आहेत. फेंगल चक्रिवादळाचा समुद्रकिनारपट्टीलगतच्या भागांवर मोठा परिणाम दिसत आहे. ऐन थंडीत पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने काही हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज रिमझिम पावसाच्या सरी बरसतील, ३ आणि ४ डिसेंबर रोजी पावसाचा जोर वाढेल. विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

error: Content is protected !!