गेल्या १५ वर्षात कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत यांचा 2900 कार्यक्रमांचा टप्पा पार

कुडाळ : आजच्या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच कलाही जोपासली पाहिजे कलेतून आपण आपले अस्तित्व निर्माण करू शकतो असे प्रतिपादन कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिने केले . गेल्या 15 वर्षात 2900 कार्यक्रमाचा टप्पा पार केल्याबद्दल तिचा गौरवपर सत्कार करण्यात आला.
    वालावलकर कुटुंबीय आणि ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी तर्फे कुडाळ शहरातील सांगिर्डेवाडी येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गेले दहा दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे भरगच्च  आयोजन ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी, सांगिर्डेवाडी येथे   करण्यात आले होते . दररोज सूर ताल लयच्या विश्वात संगीतावर ठेका धरून नृत्य सादर  गरबा रास नृत्याविष्कारामुळे नवरात्र उत्सवात रंगत आली आहे. मुलांचे रेकॉर्ड डान्स,फॅन्सी ड्रेस स्पर्धा सुद्धा झाल्या होम मिनिस्टर अर्थात महिलांच्या कलागुणांना वाव देणारा खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला यावेळी नृत्यांगना मृणाल सावंत हिचा गौरव करण्यात आला तिने गेल्या 15 वर्षात महाराष्ट्रसह गोवा कर्नाटक राज्यात, शासनाच्या विविध महोत्सवात तसेच टिव्ही चॅनलवर 2900 कार्यक्रमाचा टप्पा गाठला.तिचे कौतुक व्हावे या उद्देशाने तिचा सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ श्रीमती प्रभू, मधुसूदन वालावलकर मनिषा वालावलकर, रामचंद्र आदुर्लेकर श्री वैद्य, महेश प्रभू , ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सीचे अध्यक्ष संतोष वालावलकर, संदीप धामापूरकर ,अनंत जामसंडेकर, गायक समीर चऱ्हाटकर  भाई तेरसे,विवेक पंडित, सौ प्रतिक्षा सावंत ,समीर वालावलकर ,रूपेश पाटकर, वस्त्र वेधाच्या संचालिका योगिता वालावलकर , सौ जामसंडेकर,सीमा शिंदे, सुप्रिया धामापूरकर तेजल वालावलकर सौ परब, संदीप प्रभू ,श्री तटकरे ,श्रीमती आंबेरकर, संदीप शिंदे पूजा नाईक ,पूजा घेवडे, अन्वी जाधव, माया शिंदे शांभवी परब ओंकार सावंत सोहम वालावलकर श्री यादव वेधा वालावलकर रेसिडेन्सीचे सदस्य आदी उपस्थित होते
   यावेळी बोलताना मृणाल सावंत म्हणाल्या ,शिक्षण हे फार महत्त्वाचे आहे शिक्षणाबरोबरच प्रत्येकाने आजच्या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना एकतरी कला ही जोपासली पाहिजे गायन वादन संगीत क्षेत्रअसो अथवा क्रीडा क्षेत्र असो ज्या क्षेत्रात तुम्हाला जायचे असेल त्या क्षेत्राशी  प्रामाणिक राहा कोणतीही कला करताना त्या कलेशी प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे  नृत्य कला सादर करताना रंगमंचाशी प्रामाणिक राहायला पाहिजे असे सांगितले श्री पंडित म्हणाले आपला नवरात्र सोहळा हा सर्वांना एकत्र आणण्याचा स्तुत्य उपक्रम ड्रीमस्क्वेअर रेसिडेन्सी च्या सर्व सभासदांनी राबविला अशा कार्यक्रमातून सामाजिक भावना वाढीस लागतात  नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गेले तीन वर्षे हा कार्यक्रम घेऊन येतील मुले महिला यांच्या कलागुणांना वाव देण्याचा स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले सूत्रसंचालन संतोष वालावलकर यांनी केले

error: Content is protected !!