समोरच्या गाडीला साईड देताना डम्परचा अपघात;

चालक सुखरूप, डंपर चे मोठे नुकसान

खानोली-देऊळवाडी मार्गावर एका डम्परचा (एमएच ०६ बीडी १००२) भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या गाडीला साईड देताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बारीक खडीने भरलेला डम्पर रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. सुदैवाने, चालक पमू पवार (वय ३८, विजापूर) यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही आणि ते अपघातातून बचावले. कुडाळहून वेंगुर्ल्याकडे जाणाऱ्या या डम्परचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. डम्पर बाहेर काढण्यासाठी कुडाळहून क्रेन बोलावण्यात आली होती. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही एक दिलासादायक बाब आहे. मात्र, घटनेच्या वेळी पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हते.

error: Content is protected !!